मौदा टी पॉईंट उड्डाणपुलाचे ' परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम उड्डाणपूल ' असे नामकरण
मौदा टी पॉईंट उड्डाणपुलाचे ' परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम उड्डाणपूल ' असे नामकरण
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या नागपूर - भंडारा रोडवर असलेल्या मौदा टी पॉईंट उड्डाणपुलाचे आज रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी ' परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम उड्डाणपूल ' असे शासनाच्या वतीने नामकरण करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमान नगर,नागपूर अंतर्गत संचालित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम,पावडदौना,मौदा येथे जाणाऱ्या सेवकांसाठी तसेच मौदा शहरात जाण्यासाठी हा उड्डाणूपल खूप उपयुक्त ठरत आहे.
ह्या उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्यास नागपूर मंडळाचे अध्यक्ष श्री.रविंद्रजी गायधने, स्थानिक लोकसभा खासदार श्री.श्यामकुमार बर्वे, विधानपरिषद आमदार श्री. परिणय फुके, माजी आमदार श्री. टेकचंद सावरकर, स्थानिक नगराध्यक्ष श्री.प्रसन्ना तिडके, स्थानिक सरपंच, नागपूर मंडळाचे पदाधिकारी, संचालक, मार्गदर्शक,परमात्मा एक सेवक, स्थानिक लोकनेते, राजकीय पुढारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नमस्कार...!!