परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ,नागपूर च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ,नागपूर च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन
सर्व सेवकांसाठी आनंदाची बातमी अशी की आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, मौदा येथील मानवधर्म भव्य सेवक मेळावा कार्यक्रमात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्रजी गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे परिसरातील मार्गदर्शक तथा संगणक अभियंता श्री. सुरेंद्रजी चिंतलवार यांनी वेबसाइट बद्दल माहिती तसेच ह्या वेबसाइटच्या माध्यमातून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची शिकवण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कशी पोहचू शकते याबाबत संबोधन केले.
आपण सर्व सेवक https://parmatmaek.org.in/ ह्या लिंक वर क्लिक करून नागपूर मंडळाच्या वेबसाइटवर भेट देऊ शकता.
तसेच ह्याच वेबसाइटवर आपण आता सेवक माहिती ऑनलाइन नोंदणी सुद्धा करू शकता.
ह्या वेबसाइटच्या उपलब्धेसाठी मदत करणाऱ्या नागपूर मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, मार्गदर्शक व सर्व युवा सेवकांचे खूप खूप अभिनंदन व आभार...!!
नमस्कार...