परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तर्फे महत्त्वाची सूचना!
'परमात्मा एक सेवक मानव मंदीर' सांस्कृतिक भवन, वर्धमाननगर नागपूर कार्यालयात सध्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मंडळाद्वारे पुढील गोष्टींचे आवाहन करण्यात आले आहे:
वडिलांचा किंवा आजोबांचा फोटो ज्या सेवकांजवळ आहे, त्यांचा सेवक नंबर तोच राहील.
कुटुंबातील इतर सदस्यांनी, ज्यांनी त्याच नंबरवर वेगळी फोटो घेतला आहे, त्यांनी आपला सेवक रजिस्ट्रेशन फॉर्म भरून, भवननिधी/आश्रमनिधी/वार्षिक वर्गणीसह स्वतंत्र सेवक नंबर मिळवून घ्यावा.
(टीप: ज्यांनी भवननिधी/आश्रमनिधी आधीच भरली आहे, त्यांनी फक्त वार्षिक वर्गणी भरणे आवश्यक आहे.)